top of page
Sharada Peeth Photo 17.jpeg

श्री शारदापीठ यात्रा, काश्मीर २०२४ 

सनातन हिंदू संस्कृतीचे आद्यपीठ... २४०० हून अधिक वर्षांपूर्वीचे प्राचीन ज्ञानपीठ...

श्रीमद शंकराचार्यांचे सर्वज्ञ विद्यापीठ...

१५ ते २० ऑगस्ट २०२४ ( ५ रात्री ६ दिवस - श्रीनगर ते श्रीनगर - एकच बॅच ) 

Sharada Peeth Photo 16.jpeg

श्री शारदापीठ हे प्राचीन भारतातील सर्वोच्च ज्ञान प्रदान करणारे विद्यापीठ होते. येथील मंदिरामध्ये साक्षात शारदा म्हणजे सरस्वती देवी प्रत्यक्ष वास करीत असे. अत्यंत जागृत असे महाशक्तीपीठ अशी शारदापीठाची ओळख होती. तेथील ग्रंथ संग्रह, वाचनालय, विद्वान पंडित, आचार्य यांची महती सर्वत्र पसरलेली होती. संपूर्ण विश्वातून अत्त्युच्च ज्ञान संपादन करण्यासाठी विद्वान तेथे येत असत. शारदापीठातील ज्ञानसंपदा ज्या लिपीमध्ये लिहिली जात असे तिला शारदा लिपी असे म्हणत असत. कश्यप ऋषींनी वसवलेल्या काश्मीरचा हा प्रदेश तेव्हा शारदादेश आणि शारदा सभ्यता म्हणून ओळखला जात असे. महर्षी शांडिल्य यांनी तेथे उग्र तपश्चर्या करून माता सरस्वती देवीला प्रसन्न करून घेतले होते. त्याचप्रमाणे भगवान शंकरांचे तांडव सुरु असताना सती देवीचा उजवा हात या ठिकाणी पडला आहे म्हणून देवीचे शक्तीपीठ म्हणूनही यांची ओळख आहे. शारदापीठाची सर्वात महत्वाची ओळख म्हणजे आद्य शंकराचार्य यांनी येथील सर्वोच्च अशा सर्वज्ञ पिठावर आरोहण केले ते स्थान अशी आहे. केरळमधील कालडीहून निघालेल्या श्रीमद शंकराचार्यांनी जेव्हा शारदापीठावरील सर्वज्ञ पीठामध्ये प्रवेश केला, तेव्हा तेथील उपस्थित महान ज्ञानी विद्वान पंडितांनी त्यांची कठोर परीक्षा घेतली. त्यावेळी शंकराचार्यांनी आपल्या विलक्षण बुद्धी सामर्थ्याने सर्वांचे समाधान केले आणि त्यानंतर ते सर्वज्ञपीठावर विराजमान झाले. सनातन हिंदू धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी श्रीमद शंकराचार्यांनी जे महान कार्य केले त्यासाठी माता सरस्वतीदेविने त्यांना सर्व सामर्थ्य येथेच बहाल केले. येथून निघाल्यावर मग शंकराचार्यांनी चार दिशांना चार मठ स्थापन केले. असे हे  अत्यंत जागृत आणि दैवी उर्जेने युक्त असे स्थान आहे. समुद्रमंथनातून  निघालेल्या अमृताचे थेंब या ठिकाणी पडले आहेत अशीही श्रद्धा आहे.  हरमुख पर्वतराजीमध्ये मधुमती आणि किशनगंगा या नद्यांच्या परिसरात वसलेल्या शारदापीठाचे महत्व शारदा महात्म्य या ग्रंथामध्ये वर्णन केलेले आहे. 

नमस्ते शारदे देवी काश्मिरपूर वासिनी | प्रणमामि नित्यं विद्या बुद्धी च देही में ||

असे हे अत्यंत पवित्र आणि सनातन हिंदू संस्कृतीचे गौरवस्थान सध्या पाकिस्तानने बळकावलेल्या पाकव्याप्त काश्मीर परिसरामध्ये मुझफराबादहून १५० किमी अंतरावर नीलम जिल्ह्यामध्ये वसलेले आहे. सध्या मुळ शारदापीठ भग्नावस्थेमध्ये असून तिथे जाणे अशक्यप्राय आहे. दरवर्षी भाद्रपद शुद्ध अष्टमीला प्राचीन काळी शारदापीठ यात्रा सुरु होत असे. ही सुमारे ८१ किमीची अत्यंत अवघड यात्रा कैलास मानसरोवर यात्रेप्रमाणे अत्यंत पवित्र मानली जात आहे. खरतर शारदापीठावर भारताचाच अधिकार आहे. पाकिस्तानने हा भूभाग अनधिकृतरित्या बळकावलेला आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये समाविष्ठ व्हावा यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. मुळ शारदापीठ यात्रा जिथून सुरु होत असे तेथे शारदा यात्रा मंदिराचे २०२३ मध्ये मा. श्री. अमित शहा यांनी उद्घाटन केले आहे. त्या ठिकाणी पूर्वी एक गुरुद्वारा होता. नवीन मंदिरामधेही गुरुद्वारा आहे.  देवी सरस्वती मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

विश्व मंदिर परिषदेने याच ठिकाणी श्री शारदापीठ यात्रेचे आयोजन केले आहे. हे ठिकाण LOC म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल वर वसलेले आहे. किशनगंगा नदीच्या एका बाजूला भारत आणि दुसऱ्या बाजूला पाकव्याप्त काश्मीर अशी स्थिती आहे. हिमालयाच्या पर्वतराजीमध्ये अत्यंत सुंदर तितक्याच दुर्गम भागामध्ये हे ठिकाण वसलेले आहे. हा संपूर्ण प्रदेश सैन्यदलांच्या ताब्यात असून त्यांचे परमिट मिळाल्यावरच या ठिकाणी जाता येते. या छोट्या गावामध्ये सर्व मुस्लिम बांधव रहात आहेत. त्यांनी या यात्रेसाठी सहकार्य केले आहे. सर्व यात्रा सुरक्षित असून एक विलक्षण चैतन्यदायी अनुभूती देणारी आहे. साहसी धार्मिक अध्यात्मिक अनुभूतीची आवड असणाऱ्या भाविक श्रद्धाळू यात्रेकरुंना ही यात्रा एक विलक्षण आनंद देईल असा विश्वास वाटतो 

✅ आर्मी सुरक्षा झोन मधून LOC पर्यंत प्रवास
✅ इनरलाईन परमिटसह - टेम्पो ट्रॅव्हल्सने प्रवास
✅ देवीपाठ,  हवन, पूजा,  अभिषेक इ.
✅ श्रीनगर येथे उत्तम हॉटेलमध्ये वास्त्यव्य - शुद्ध शाकाहारी भोजन

दर्शनीय स्थळ

Sharada Peeth Photo 20.jpeg
Sharada Peeth Photo 5_edited.jpg
Sharada Peeth Photo 8.jpeg
Sharada Peeth Photo 8.jpeg
  • शारदापीठ यात्रा कार्यक्रम :

  1. दिवस पहिला - दुपारी ३ pm नंतर श्रीनगर येथे आगमन - हॉटेल निवास 

  2. दिवस दुसरा - सकाळी ७ वाजता शारदापीठ मंदिराकडे प्रस्थान  - रस्त्यामध्ये नाश्ता आणि भोजन दुपारी ४ pm पर्यंत पोहोचणे - मुक्काम 

  3. दिवस तिसरा - किशनगंगा स्नान, होम हवन, देवी पाठ पूजा, अभिषेक - मुक्काम 

  4. दिवस चौथा - सकाळी ७ वाजता श्रीनगरकडे प्रस्थान  - वाटेमध्ये बंगश व्हॅली आणि माता क्षीरभवानी मंदिर दर्शन - वाटेत नाश्ता  - भोजन, ७ pm पर्यंत श्रीनगर पोहोचणे - हॉटेल भोजन निवास

  5. दिवस पाचवा - श्रीनगर लोकल टूर - शंकराचार्य मंदिर, ज्येष्ठादेवी मंदिर, दुपारनंतर शॉपिंग साठी मोकळा वेळ - हॉटेल भोजन निवास 

  6. दिवस सहावा - सकाळी १० am चेक आऊट

  • यात्रेसाठी सूचना , नियम व अटी:

  1. ही यात्रा श्रीनगर ते श्रीनगर अशी आहे. पहिल्या दिवशी आपल्या खर्चाने दुपारी 3 नंतर कधीही श्रीनगर शहरामध्ये हॉटेल पत्त्यावर पोहोचायचे आहे. शेवटच्या सहाव्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत हॉटेल सोडायचे आहे. याप्रकारे आपले येण्या - जाण्याचे नियोजन करावे. ८ ऑगस्ट पर्यंत हॉटेलचे नाव, पत्ता आणि लोकेशन तसेच यात्रा स्वयंसेवकांचे क्रमांक पाठवले जातील. 

  2. श्रीनगर येथे थेट विमानसेवा उपलब्ध आहे. ( मुंबई - पुणे - नागपूर ते श्रीनगर ) जाता येता सुमारे २० ते २५ हजार रुपये विमान तिकीट आहे. रेल्वेने जम्मूपर्यंत जाता येते. तेथून खाजगी वाहनाने श्रीनगर येथे पोहोचता येते.

  3. निवासस्थानी सर्वत्र शुद्ध शाकाहारी भोजनाची व्यवस्था आहे. मात्र प्रवासामध्ये पूर्णतः शाकाहारी हॉटेल उपलब्ध नाहीत. त्या त्या ठिकाणी उपलब्ध सेवेचा लाभ घ्यावा लागेल.

  4. मुख्य यात्रा ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांची वस्ती आहे. तिथे होम स्टे व्यवस्था आहे. एका खोलीमध्ये ६ ते ८ जण अशी व्यवस्था आहे. महिला व पुरुषांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. स्वतंत्र आचारीद्वारा  भोजन व्यवस्था केली आहे. या ठिकाणी सर्व प्रकारचे सहकार्य करावे लागेल.

  5. यात्रेचा सर्व कार्यक्रम नियोजित आहे. परिस्थितीप्रमाणे वेळापत्रक मागे पुढे होवू शकते. त्याचप्रमाणे गरज असल्यास कार्यक्रमामध्ये बदल होवू शकतो याची कृपया नोंद घ्यावी.

  6. ही एक धार्मिक अध्यात्मिक यात्रा आहे. यामध्ये थोडीफार गैरसोय व्हायची शक्यता आहे. याची कृपया नोंद घ्यावी.

  7. एकदा केलेली नोंदणी कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द करता येणार नाही. तसेच भरलेली रक्कम परत मिळणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी.

  8. सर्व प्रकारच्या तक्रारी, न्यायालयीन दावे याची सीमा पुणे शहर न्यायालयीन सीमा ही राहील. 

  • यात्रा पॅकेज : रु. २७०००/- फक्त  

श्रीनगर ते श्रीनगर नोंदणी करताना ऍडव्हान्स रु. १५०००/- बाकी रु. १२०००/- यात्रेच्या पहिल्या दिवशी रोखीने हॉटेलमध्ये द्यावी.  सर्व रक्कम नोंदणी करतानाही भरता येईल. बँक खात्यावर किंवा गुगल पे क्रमांकावर ऍडव्हान्स रक्कम पाठवता येईल.

 

  • बँक खात्याची माहिती : 

बँक खात्याचे नाव : विश्व मंदिर फाऊंडेशन ( Vishwa Mandir Foundation )
बँकेचे नाव :  बँक ऑफ महाराष्ट्र, डेक्कन जिमखाना शाखा, पुणे ४११००४
खाते क्रमांक : 60358923479                      IFSC code – MAHB0000003

 

गुगल पे क्रमांक :  +918149471691 (रोहन उदय पाटुकले)
गुगल पे द्वारे शुल्क भरल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट, आपले नाव, मोबाईल व आपली बॅच ही माहिती याच (+918149471691) क्रमांकावर व्हॉटसअप द्वारे कळवावी.

    

  • यात्रेसाठी नोंदणी कशी करावी ?

  1. यात्रेसाठी प्रथम नोंदणी प्रथम प्रवेश या तत्वावर नोंदणी केली जाईल. ऍडव्हान्स मिळाल्यावर नोंदणी नक्की केली जाईल. 

  2. नोंदणी ऑनलाईन करता येईल.

  3. सकाळी ११ ते सायंकाळी ७ या दरम्यान पुणे येथील कार्यालयात येवून नोंदणी फॉर्म भरून नोंदणी करता येईल. कार्यालयामध्ये रक्कम रोखीने किंवा चेकने स्वीकारली जाईल. 

  4. नोंदणी करताना आपले नाव व पत्ता आधार कार्ड प्रमाणे पडताळून पहावा. त्याच नावाने परमीट निघते. परमीट निघाल्यावर बदलता येत नाही.

  • यात्रेकरूंसाठी सूचना :

  1. यात्रेसाठी आवश्यक तेवढे पण कमीत कमी सामान घेवून यावे.

  2. यात्रे दरम्यान फारसे चालावे लागत नाही. मुख्य मंदिर परिसरात सुमारे एक ते दोन किमी चालावे लागते.

  3. यात्रेच्या मुख्य ठिकाणी निवास मुस्लीम वस्तीमध्ये होणार आहे. त्या ठिकाणी परिस्थितीचे भान ठेवून शांततेने आणि समंजसपणे व्यवहार करणे अपेक्षित आहे.  अनावश्यक उत्साह Excitement टाळणे गरजेचे आहे. 

  4. यात्रेचा शेवटचा दिवस श्रीनगर येथे लोकल टूर आणि साईट सीइंग साठी ठेवलेला आहे. त्या दिवशी दुपारनंतर दाल लेक, शिकारा सफर व शॉपिंगसाठी वेळ राखून ठेवला आहे.

  5. यात्रे दरम्यान यात्रा व्यवस्थापक  आणि त्याचे सहकारी स्वयंसेवक यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. 

  6. ही यात्रा म्हणजे पिकनिक किंवा मज्जा ट्रीप नाही याची नोंद घ्यावी. यात्रेतून एक विलक्षण उत्कट अनुभव आपल्याला मिळेल असा विश्वास वाटतो.

  7. भारत सरकार PoK भारतात समाविष्ट व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे अशा बातम्या आपण सध्या पहात आहोत. या यात्रे दरम्यान PoK भारतात समाविष्ट व्हावा अशी प्रार्थना आपण करुया.

bottom of page