श्रीगुरुचरित्र चिंतन वर्ग (ऑनलाईन)
श्रीदत्त जयंती 2024 निमित्ताने दत्त भक्तांसाठी, गुरुचरित्राचे पारायण करणाऱ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी श्रीगुरुचरित्र शास्त्रशुद्धरीत्या समजून घेता यावे म्हणून या अभ्यासवर्गाचे आयोजन केले आहे. कोणतीही उपासना किंवा अनुष्ठान नीट समजून समजून केल्यास त्याचे फळ अनेक पटींनी मिळते असे शास्त्र सांगते.
कलियुगातील उपास्य देवता श्रीदत्तात्रेय ही आहे. केवळ संकल्पाने आणि प्रार्थनेने भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे दैवत म्हणजे श्रीदत्तात्रेय हे दैवत आहे. त्यांना स्मर्तृगामी असे म्हटले जाते. दत्त संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा, प्रासादिक आणि फलदायी असा ग्रंथ म्हणजे श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ आहे. त्याला पाचवा वेद असेही म्हटले जाते. त्याचे माहात्म्य अपरंपार आहे. गेली शेकडो वर्षे हजारो भाविक भक्त नित्यनियमाने त्याचे पारायण करतात. श्रीगुरुचरित्राच्या विलक्षण अनुभूती हजारो लोकांनी घेतलेल्या आहेत. या ग्रंथामध्ये एक मंत्रगर्भ सामर्थ्य आहे. आपल्या पैकी अनेकांना श्री या ग्रंथाची माहिती असते. त्याचे पारायण ही केलेले असते. मात्र त्याचा अभ्यास नसतो. त्याची शास्त्रशुद्ध बैठक नसते. श्रीगुरुचरित्राबद्दल आणि त्याच्या पारायणाबद्दल अनेक शंका आपल्या मनामध्ये असतात. (उदा. स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये, इ. )
खरंतर हा एक सांप्रदायिक आणि त्वरित फलश्रुती प्रदान करणारा ग्रंथ आहे. त्याचे कर्मकांड, उपासनाकांड आणि भक्तिकांड असे विभाग आहेत. यामध्ये अनेक दैवी मंत्रश्लोक आणि अनुष्ठाने, व्रते यांची माहिती आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचा शास्त्रशुद्ध रीतीने अभ्यास करावा, म्हणून विश्व मंदिर परिषदेने हा अभ्यासवर्ग आयोजित केला आहे. या अभ्याक्रमाने श्रीगुरूचरित्र ग्रंथ माहात्म्य, त्याचा इतिहास, निर्मिती, उद्देश, त्यातील ज्ञान भांडार, माहात्म्य, पारायण - पठण पद्धती यांचे ज्ञान सहभागी व्यक्तींना मिळेल. अनेक शंकांचे निरसन होईल. अत्यंत प्रसन्न मनाने आणि शुद्ध चित्ताने गुरुचरित्र ग्रंथाचे पठण आणि पारायण करता येईल. त्याची उत्तम अशी फलश्रुती प्राप्त होईल. कोणत्याही व्यक्तीला या अभ्यासक्रमानंतर श्रीगुरुचरित्राचे निःशंक मनाने पठण पारायण करता येईल. त्याच्या जीवनामध्ये श्रीदत्तप्रभूंच्या कृपा आशीर्वादाची अनुभूती प्राप्त होईल. जीवनामध्ये एक नवीन अध्याय सुरू होईल असा विश्वास वाटतो.
🟧 अभ्यासवर्गातील विषय
✅ श्रीदत्त संप्रदायाची ओळख
✅ श्रीगुरुचरित्र ग्रंथ - इतिहास आणि रचना
✅ श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे माहात्म्य
✅ श्रीगुरुचरित्र - कर्मकांड
✅ श्रीगुरुचरित्र - त्रिकांड मांडणी - (उपासना - भक्ति - ज्ञान)
✅ श्रीगुरुचरित्र पारायणपद्धती आणि त्याचे महत्त्व
✅ श्रीगुरुचरित्र ग्रंथातील मुख्य विचार
✅ श्रीगुरुचरित्राला पाचवा वेद का म्हटले जाते ?
✅ श्रीगुरुचरित्रबाबत प्रश्न आणि शंका
✅ रेकॉर्डिंग
✅ ई-प्रमाणपत्र
सुचना: एकदा नोंदणी केल्यावर रद्द करता येणार नाही