top of page
unnamed.jpg

यावया येथे पुण्य पाहिजे... विश्रांती वाटते येथे... 

शिवथरघळीमध्ये प्रापंचिकांसाठी प्रपंच परमार्थ विद्या शिबिर

  • शिवथरघळीमध्ये प्रापंचिकांसाठी प्रपंच परमार्थ विद्या शिबिर

  • 27 डिसेंबर 2024  ते 1 जानेवारी 2025 

  • वयोगट :  ३० ते ६५ वर्षे 

  • पुणे ते पुणे वाहन व्यवस्था उपलब्ध. मर्यादित जागा.

  • त्वरित ऑनलाईन नोंदणी करा...

images.jpeg

शिवथरघळ हे एक अत्यंत अद्भुत आणि निसर्गरम्य असे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वरंध घाट उतरल्यानंतर भोर ते महाड रस्त्यावर बिरवाडी गावाजवळ शिवथरघळ वसलेली आहे. घळी शेजारी धीरगंभीर आवाजामध्ये कोसळणारा धबधबा आहे. अत्यंत विलक्षण अशा सौंदर्याने नटलेल्या परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये निवास करणे ही एक अद्भुत आणि चैतन्यदायी अनुभूती आहे. 

शिवथरघळ हे ठिकाण सुंदरमठ या नावाने देखील प्रसिद्ध आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी येथे दासबोध या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी ग्रंथाची रचना केलेली आहे. आधी प्रपंच करावा नेटका | मग घ्यावे परमार्थ विवेका | प्रपंच सोडून परमार्थ कराल | तिथे तुम्ही दुःखी व्हाल || असे प्रतिपादन समर्थ रामदास स्वामी यांनी केलेले आहे. प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय करून आणि चारी पुरुषार्थ प्राप्त करून आपली जीवन कसे यशस्वी करावे याचे शिक्षण देणाऱ्या प्रपंच परमार्थ विद्या शिबिराचे आयोजन विश्व मंदिर परिषदेने केले आहे.

शिवथरघळ ही तपोभूमी आहे. अत्यंत पवित्र आणि पावन अशी भूमी आहे त्याचप्रमाणे शिवथरघळ एक वैज्ञानिक कोडे ही आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे उपग्रहांची रेंज येत नाही. घळीभोवती एक दैवी ऑरा आहे. शिवथरघळ ही एक Absolutely Frequency Less अशी जागा आहे. याबाबतीत संशोधन सुरू आहे. अत्यंत शांतता, कंपन रहित अवस्था, निर्विचार स्थिती, वायू ध्वनी प्रदूषण मुक्त आणि आपल्यातील अष्ट सात्विक भावांशी जागृती करणारी, चित्तातील चैतन्याचे स्फुल्लिंग प्रज्वलित करणारी दैवी ऊर्जा प्रदान करणारी शिवथर घळ जणूकाही देवभूमी आहे.

शिवथर घळी मध्ये चार-पाच दिवस शांतपणे वास्तव्य करून विद्वान, ज्ञानी, अनुभवी, श्रेष्ठ व्यक्तींकडून काही ज्ञानाचे कण वेचावेत... चर्चा करावी, स्वतःबरोबर मुक्त संवाद करावा, आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करावे, आपला प्रपंच योग्य मार्गावर चालला आहे का याची शहानिशा करावी, जीवन प्रवास योग्य मार्गावर आहे का याची खातरजमा करून घ्यावी, चिंतन, मनन, श्रवण करावे, ध्यान करावे, साधना उपासना करावी, असा या शिबिराचा उद्देश आहे. अनेक मान्यवर या शिबिरामध्ये सहभागी होणार असून ते आपल्या बरोबर आत्मिक हितगुज साधणार आहेत. पती-पत्नी यांनी एकत्रित सहभागी व्हावे,असे अपेक्षित आहे. एका व्यक्तीलाही सहभागी होता येईल.  आपला जीवनाला एक विलक्षण कलाटणी देऊ शकेल असे हे शिबिर असेल. पुढील जीवनासाठी दिशादर्शक अशी अनुभूती यातून नक्की मिळेल असा विश्वास वाटतो. 

 

✅ मार्गदर्शक :  प्रा. क्षितिज पाटुकले, डॉ. अजित आपटे, रोहिणी परांजपे, डॉ. अवंतिका टोळे, प्रा स्मिता कुलकर्णी, श्री. प्रणव गोखले, श्री. अभय भंडारी (वेळेच्या उपलब्धतेनुसार मार्गदर्शक उपस्थित राहतील)

✅ शिबिर देणगी शुल्क : रु.  ६०००/- प्रति व्यक्ती. (नोंदणी करताना संपूर्ण शुल्क भरावे लागेल.)

✅ प्रवास शिवथरघळी मध्ये आपल्या वाहनाने थेट येता येईल. 

पुणे ते पुणे अशी वाहन व्यवस्था उपलब्ध आहे. पुणे ते पुणे वाहन व्यवस्था जाता येता हवी असल्यास रुपये १८००/- प्रति व्यक्ती - (नोंदणी करताना संपूर्ण शुल्क भरावे लागेल.)

✅ निवास व्यवस्था  : शिबिर ठिकाणी स्त्री आणि पुरुष वेगवेगळी निवास व्यवस्था आहे. निवास भोजन व्यवस्था सामूहिक आहे. स्वतंत्र खोल्या उपलब्ध नाहीत. त्या पवित्र जागेत कोणतेही व्यसन करण्यास मनाई आहे.

✅ भोजन व्यवस्था : शुद्ध शाकाहारी सात्विक भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. 

🟥 नोंदणी कशी करावी ?  

STEP 1️⃣ : ऑनलाईन नोंदणी फॉर्म भरा 

STEP 2️⃣ : बँक खात्यात शुल्क भरा 

STEP 3️⃣ : अर्ज व शुल्क भरल्याची माहिती व्हॉटसअप द्वारे 70662501262 यावर कळवा. 

देणगी शुल्क भरण्यासाठी बँक खात्याची माहिती : 

बँक खात्याचे नाव : विश्व मंदिर फाऊंडेशन ( Vishwa Mandir Foundation )
बँकेचे नाव :  बँक ऑफ महाराष्ट्र, डेक्कन जिमखाना शाखा, पुणे ४११००४
खाते क्रमांक : 60358923479                      IFSC code – MAHB0000003

Disclaimer

Please note that this spiritual shibir is organised by Vishwa Mandir Parishad. The contribution for participation collected is by Vishwa Mandir Parishad for the organising, management, publicity, arrangements and logistics. There is no financial role of Shri Samartha Seva Mandal Sajjangad and Shri Sundarmath Seva Samiti.

bottom of page