top of page

नियोजित कार्यशाळा

सर्व शिवभक्त, शिव अनुयायी आणि अभ्यासक यांना शिवलीलामृत ग्रंथाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी आणि शास्त्रशुद्धरीत्या समजून घेता यावे यासाठी या अभ्यासवर्गाचे आयोजन केले आहे. सहभागीना प्रमाणपत्र मिळणार...

🟧 अभ्यासवर्गातील विषय:
✅ भगवान शंकर देवतेची ओळख 
✅ स्कंदपुराणाची ओळख 
✅ भगवान शंकर या देवतेचे माहात्म्य आणि वैशिष्ट्ये
✅ शिवलीलामृत ग्रंथाची ओळख 
✅ शिवलीलामृताचे पारायण कसे करावे ? 
✅ शिवलीलामृताची फलश्रुती 
✅ भगवान शंकरांच्या विविध उपासना पद्धती 
✅ शंकरांना प्रिय व्रते आणि अनुष्ठाने 
✅ पुराणांमध्ये वर्णिलेले शिव माहात्म्य 
✅ प्राचीन संस्कृत साहित्यातील ग्रंथांमध्ये वर्णिलेले शिव माहात्म्य 
✅ विविध शिव भक्तांच्या कथा 
✅ रुद्राक्ष आणि रुद्राध्याय यांचे माहात्म्य 
✅ शिवाला भस्म का प्रिय आहे? भस्म माहात्म्य 
✅ शिवलीलामृताच्या पठणाचे लाभ इ.

शिवलीलामृत अभ्यास वर्ग (ऑनलाईन)

18 ते 24 फेब्रुवारी | संध्या. 8 ते 9

मा. श्री. प्रणव गोखले - प्रख्यात वक्ते, प्रवचनकार, संस्कृत आणि धर्मशास्त्र विद्वान

या सर्व पार्श्वभूमीवर श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचा शास्त्रशुद्ध रीतीने अभ्यास करावा, म्हणून विश्व मंदिर परिषदेने हा अभ्यासवर्ग आयोजित केला आहे. या अभ्याक्रमाने श्रीगुरूचरित्र ग्रंथ माहात्म्य, त्याचा इतिहास, निर्मिती, उद्देश, त्यातील ज्ञान भांडार, माहात्म्य, पारायण - पठण पद्धती यांचे ज्ञान सहभागी व्यक्तींना मिळेल. अनेक शंकांचे निरसन होईल. अत्यंत प्रसन्न मनाने आणि शुद्ध चित्ताने गुरुचरित्र ग्रंथाचे पठण आणि पारायण करता येईल. त्याची उत्तम अशी फलश्रुती प्राप्त होईल. कोणत्याही व्यक्तीला या अभ्यासक्रमानंतर श्रीगुरुचरित्राचे निःशंक मनाने पठण पारायण करता येईल. त्याच्या जीवनामध्ये श्रीदत्तप्रभूंच्या कृपा आशीर्वादाची अनुभूती प्राप्त होईल. जीवनामध्ये एक नवीन अध्याय सुरू होईल असा विश्वास वाटतो. 
🟧 अभ्यासवर्गातील विषय
✅ श्रीदत्त संप्रदायाची ओळख 
✅ श्रीगुरुचरित्र ग्रंथ - इतिहास आणि रचना
✅ श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे माहात्म्य 
✅ श्रीगुरुचरित्र - कर्मकांड 
✅ श्रीगुरुचरित्र - त्रिकांड मांडणी - (उपासना - भक्ति - ज्ञान)
✅ श्रीगुरुचरित्र पारायणपद्धती आणि त्याचे महत्त्व 
✅ श्रीगुरुचरित्र ग्रंथातील मुख्य विचार
✅ श्रीगुरुचरित्राला पाचवा वेद का म्हटले जाते ? 
✅ श्रीगुरुचरित्रबाबत प्रश्न आणि शंका

श्रीगुरुचरित्र चिंतन वर्ग (ऑनलाईन)

5 ते 12 डिसेंबर | संध्या. 8 ते 9

प्रा. प्रणव गोखले - प्रख्यात वक्ते, प्रवचनकार, संस्कृत आणि धर्मशास्त्र विद्वान

bottom of page