सनातन हिंदू धर्म शिक्षण
विश्व मंदिर परिषदेचा ऑनलाईन अभ्यासक्रम
शैक्षणिक सहयोग - भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टिम्स
चला.... हिंदू धर्माचा अभ्यास करूया... जाणून घ्या, नीट समजून घ्या...आपल्या भावी पिढीला धर्मशिक्षणाची जाणीव करून द्या...प्रत्येक हिंदू व्यक्तीसाठी महत्त्वाचा कोर्स - हिंदुत्वाची आवश्यक माहिती प्राप्त करून देणारा अभ्यासक्रम...
सनातन हिंदू धर्म शिक्षण
हिंदू धर्म जाणून घ्या साध्या सोप्या भाषेत - सनातन हिंदुत्व आणि हिंदू धर्म शिक्षण... आज प्रत्येक हिंदूला सनातन हिंदू धर्माचे ज्ञान असणे अनिवार्य आहे आणि ते आपल्या अस्तित्वासाठी खूप महत्वाचे आहे. सर्वात प्राचीन, सर्वात पुरातन, सर्वात वैज्ञानिक (Scientific), सर्वात स्वतंत्र, सर्वात आनंददायी, जीवनाची सर्वोत्तम धारणा बाळगणारा, ईश्वराच्या समीप नेणारा, सर्वांना सोबतीने पुढे नेणारा, सर्वांच्या आनंदाचे, समृद्धीचे स्वप्न साकार करणारा, व्यक्ती, समाज आणि पर्यावरण - निसर्ग - विश्वाचा समतोल राखणारा आपला हिंदू धर्म... हजारो वर्षांपासून चालत आला आहे.
कधीही न मिटणारी सनातन हिंदू वैदिक संस्कृती आणि धार्मिक परंपरा... जिला कोणीही संपवू शकत नाही, कोणी नष्ट करू शकत नाही... कारण अत्यंत पराक्रमी आणि विजिगिषु राजे, सम्राट आणि महापुरुषांनी हिंदू धर्माची पुन: स्थापना केली आहे.
आमचा विश्वास आहे की...
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
ईश्वर अवतार नक्की घेईल पण आता आपण सर्वांनी स्वतः हिंदू धर्माचे रक्षण करायचे आहे.. स्वतः श्रीराम, श्रीकृष्ण, छ. शिवाजी महाराज, झाशीची राणी बनायचे आहे ... धर्मो रक्षती रक्षित: हे जरी खरे असले तरी त्यासाठी आवश्यक आहे सनातन हिंदू धर्माचे ज्ञान !
आशीर्वाद
स्वामी गोविंददेवगिरी महाराज
मार्गदर्शक
नीरज अत्री
प्रमुख मार्गदर्शक
मदन महाराज गोसावी
मार्गदर्शक
अभिजित जोग
तंत्रज्ञान मार्गदर्शक
डॉ. विजय भाटकर
मार्गदर्शक
डॉ. नरेंद्र जोशी
संकल्पना
प्रा. क्षितिज पाटुकले
मार्गदर्शक
काजल हिंदुस्तानी
या कोर्समध्ये काय आहे...?
हिंदू धर्माची प्राचीनता, हिंदू हा शब्द कुठून आला? म्हणजेच हिंदू शब्दाचा उगम, हिंदू धर्मातील महत्त्वाचे ग्रंथ - वेद, उपनिषद, दर्शन, पुराण, रामायण, महाभारत, मनुस्मृती इ., पराक्रमी पौराणिक सम्राट आणि राजे, धर्म आणि रिलीजन यांच्यातील फरक, अब्राहमिक अर्थात सेमिटिक पंथांचा तुलनात्मक अभ्यास, हिंदू धर्माची १० वैशिष्ट्ये, देव, देवी, मंदिर संकल्पना, हिंदू व्यक्तीचे जीवन ध्येय - चार पुरुषार्थ, चार आश्रम, त्रिगुण, पंचयज्ञ, चार वर्ण, स्वाभिमानी हिंदू असण्याची १०८ कारणे, हिंदू धर्म आणि धर्मनिरपेक्षता, पाश्चात्यांचे अनुकरण म्हणजे आधुनिकता? शत्रुबोध म्हणजे हिंदू धर्माचे शत्रू कोण आहेत आणि त्यांच्याशी कसे वागावे, सनातन धर्माचा व्यवहारात योग्य वापर कसा करावा... इ.
अभ्यासक्रम
१) अभ्यासक्रमाचा उद्देश
२) सनातन हिंदू धर्म काय आहे? - उत्पत्ती, व्याख्या, भूगोल
३) धर्म म्हणजे काय? - व्याख्या, हिंदु धर्म म्हणजे सनातन धर्म ! वैदिक धर्म!
४) रिलीजन (उपासनापद्धती) म्हणजे काय? - धर्म म्हणजे रिलीजन नाही, अब्राहमिक उपासनापद्धतींची उत्पत्ती
५) हिंदू धर्म आणि इतर उपासनापद्धतींचा तुलनात्मक अभ्यास
६) सनातन हिंदू धर्माची दहा वैशिष्ट्ये – वैश्विक बंधुत्व - एक: अहं बहु स्याम, संपत्तीचे न्याय्य वितरण - तेन त्यक्तेन भुञ्जीथा, निःस्वार्थ कर्म - कर्मणि एव अधिकार:, बुद्धिप्रामाण्यवाद, उपासनेची पद्धत निवडण्याचे स्वातंत्र्य - एकं सद् विप्रा: बहुधा वदन्ति:, उपासनेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करा - अग्रतः चतुरो वेदाः, पृष्ठत: सशरं धनु:, विधीपालन - आचारप्रभव: धर्म:, अष्टांग योग - अहिंसा सत्यं अस्तेयं शौचंद्र इन्द्रियग्रह:, नैतिक आचरण - साधनां अनेकता:, मोक्ष
७) देवी-देवता आणि मंदिरांची संकल्पना
८) हिंदू धार्मिक ग्रंथ, महान सम्राट आणि त्यांचे महत्त्व - ग्रंथांचे प्रकार, श्रुति आणि स्मृति ग्रंथ, महान पौराणिक सम्राट, महत्त्व
९) १६ संस्कार आणि त्याचे तत्वज्ञान - आवश्यकता, महत्त्व, भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाशी १६ संस्कारांचा संबंध
१०) हिंदूंचे जीवन मिशन – ४ पुरुषार्थ, ४ आश्रम, तीन ऋण, चातुर्वर्ण्य, पंचयज्ञ
११) हिंदू धर्माचा वैज्ञानिक आधार - आचरण धर्म, यज्ञ, विधी, अनुष्ठानम, सण इ.
१२) हिंदू असण्याचा अभिमान बाळगण्याची १०८ कारणे
१३) हिंदू धर्म इतर उपासना पद्धतींप्रमाणे सांप्रदायिक नाही!
१४) हिंदू धर्म आणि धर्मनिरपेक्षता
१५) आधुनिक म्हणजे पाश्चात्य नव्हे !
१६) शत्रू बोध
१७) सनातन हिंदू धर्म आणि आजचे जग
अभ्यासक्रम रचना :
-
कालावधी : एक महिना - सोमवार ते शुक्रवार - दररोज संध्याकाळी - 8 ते 9
-
ऑनलाइन झूम व्याख्याने + ऑनलाइन परीक्षा + अभ्यास साहित्य ईबुक, अभ्यासक्रम
-
भाषा : हिंदी आणि मराठी - भिन्न बॅचेस
-
प्रमाणपत्र दिले जाईल.
-
वय - 14 वर्षे वरील सर्व हिंदू बंधू आणि भगिनी
-
देणगी शुल्काची रक्कम - किमान रु. 500/- आणि त्याहून अधिक
-
पहिली बॅच 1 ऑगस्ट 2023 पासून सुरू होईल.
-
ऑनलाइन प्रवेशासाठी खालील लिंकवर क्लिक करा...