top of page
11-Rules-You-Must-Follow-When-Visiting-Angkor-Wat.png

विश्व ​मंदिर परिषद

हिंदू मंदिरांची आणि भक्तांची वैश्विक संघटना  

Brahma Temple

उद्दिष्टे 

भारतीय मंदिराचे एकत्रीकरण, सुसूत्रीकरण, एकमेकांना सहकार्य, तसेच मंदिरांना समाजाच्या सर्व घटकांबरोबर जोडणे आणि तरूणाईचे प्रबोधन, हा विश्व मंदिर परिषदेचा व्यापक उद्देश आहे. यासाठी सर्व प्रकारच्या उपलब्ध संसाधनांचा विशेषत: संपर्क साधने आणि तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग हे परिषदेच्या कार्याचे मुख्य सूत्र आहे. परिषदेच्या कार्याची व्याप्ती आणि उद्दीष्टे ढोबळमानाने खालील प्रमाणे आहेत.

१.    मंदिरांचे संघटन : सर्व मंदिरांची माहिती एकत्र करून त्यांच्या मध्ये समन्वय निर्माण करणे. प्रांत, जिल्हा, तालुका असे वर्गीकरण करणे. प्रत्येक मंदिराचा इतिहास, परिसर, वैशिष्ट्ये, सद्यस्थिती, सुविधा, दैनंदिन कार्यक्रम, उत्सव, पूजा - आर्चा इ. सर्व माहिती संकलित करणे. त्यांच्या पुस्तिका, माहितीपत्रके बनविणे. ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे. इ.


२.    मंदिरांना सल्ला सेवा केंद्र : मंदिरांना त्यांच्या आवश्यकतेनुसार सर्व प्रकारचे साहाय्य उपलब्ध करून देणे. उदा. कायदेशीर व व्यवस्थापनाच्या दृष्टीने सल्ला, अडचणी सोडवण्यासाठी मदत, तांत्रिक साहाय्य इ.


३.    ई - मंदिर : प्रत्येक मंदिराची माहिती वेबसाईट वर उपलब्ध करून देणे. माहितीपत्रक बनविणे, त्यांची वेबसाईट बनविणे, त्यांना ऑनलाईन पूजा, अभिषेक, अनुष्ठाने, वार्षिक सेवा, शाश्वत सेवा इ. उपलब्ध करून देणे, मंदिरांची परिपूर्ण व्हिडीओ डॉक्युमेंटरी बनविणे. ती सर्वांना मोफत पाहण्यासाठी उपलब्ध करून देणे. ऑनलाईन दर्शन (व्हर्च्युअल दर्शन) व उत्सवांचे प्रक्षेपण करणे इ. मुळे मंदिरांचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर होईल. भौगोलिक सीमा ओलांडून मंदिरे भाविक भक्तांबरोबर जोडली जातील.


४.    आर्थिक सहाय्य : मंदिरांच्या विविध उपक्रमांसाठी आणि प्रकल्पांसाठी साहाय्य मिळवून देणे. उदा. जीर्णोद्धार, भक्त निवास, गोशाळा, देवराई, सामाजिक उपक्रम, सभामंडप, अन्नछत्र, वाचनालय, इ.


५.    भावबंधन : प्रत्येक मंदिरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांची नोंदणी करणारी व्यवस्था निर्माण करणे, भक्तांना मंदिराच्या विविध उपक्रमांची आणि उत्सवाची माहिती मोबाईल, ईमेल, व्हॉट्सअ‍ॅप इ. माध्यमातून कळविणे. मंदिर आणि भाविक यांच्यात कायमस्वरूपी संपर्क निर्माण करणे, इ.


६.    मंदिर पर्यटन : मंदिरांची माहिती तंत्रज्ञानाच्या आणि इतर माध्यमातून देशात आणि जगभरामध्ये पोहोचवणे. तेथील विविध परंपरा, उत्सव, उपक्रम यांची माहिती पोहोचवणे. त्यातून मंदिर पर्यटन, मंदिर अभ्यास पर्यटन (टेंपल टुरिझम) विकसित करणे.


७.    सेवा प्रशिक्षण : मंदिरातील पुजारी, इतर कर्मचारी, विश्वस्त यांना गरजेप्रमाणे प्रशिक्षण देणे, कार्यशाळा आयोजित करणे, नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी साहाय्य करणे, यामध्ये संगणक, फोटोग्राफी, व्हिडीओ, कायदेविषयक, अकाऊंटींग, आयकर इ. गरजेप्रमाणे प्रशिक्षण देणे.


८.    मंदिर : एक विद्यापीठ आणि संशोधन केंद्र : सनातन संस्कृती, मंदिर आणि प्राचीन भारतीय ज्ञानविज्ञान, हिंदू धर्म, संस्कृती याविषयी विविध प्रकारचे अभ्यासक्रम ऑफलाईन आणि ई- लर्निंगच्या माध्यमातून सर्व भक्तांपर्यंत पोहोचवणे. प्राचीन भारतीय परंपरा, संस्कृती, रुढी , परंपरा यांचा अर्थ आजच्या काळाशी समर्पक समन्वय साधून तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे. हिंदू देवस्थाने, मंदिरे, परंपरा, संस्कृती, यांसंबधी संशोधन करणे. अभ्यास, संशोधन आणि प्रयोग यांच्या माध्यमातून मंदिर संस्कृती पुनर्जीवित करणे.


९.    “ टोल फ्री ” मंदिरे  :- भाविक भक्तांसाठी मंदिरे, देवस्थाने, तीर्थक्षेत्रे, याठिकाणी कसे जावे, तेथील उपक्रम, उपलब्ध व्यवस्था, इ. सर्व प्रकारची माहिती आणि साहाय्य उपलब्ध करून देणारी  " टोल फ्री " हेल्प लाईन सेवा सुरू करणे. 


१०.    परंपरांचे पुनरूज्जीवन :- हिंदू धर्म आणि संस्कृती यांच्याशी निगडित विविध उपक्रमांचे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुनरूज्जीवन करणे, उदा. कीर्तन, प्रवचन, नृत्य, खेळ, जन्मोत्सव, संगीत, नाटक, परंपरा, इत्यादिना तरूणाईबरोबर " कनेक्ट " करणे. 


११.    भारताबाहेरील विविध देशातील मंदिरांबरोबर समन्वय :- भारताभाहेरील देशातील मंदिरांशी संपर्क करणे. त्यांचे साहाय्य घेणे आणि त्यांना साहाय्य करणे. त्यांचे बरोबर भेटी / सहली आयोजित करणे. त्यांना नवनवीन उपक्रम आयोजित करण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यांच्या विश्वस्तांच्या प्रस्थापित मंदिरांशी भेटी आणि विश्वस्तांबरोबर चर्चा घडवून आणणे, इत्यादी. 


१२.    मंदिर संरक्षक :- ज्या ठिकाणी मंदिरांना त्रास होत आहे, विघातक शक्तींपासून, गुंडगिरीपासून उपद्रव होत आहे, त्यांना सर्वतोपरी साहाय्य करणे, त्याच्या पाठीमागे दबावगट आणि हिंतचिंतकांचे जाळे उभे करणे. मंदिर संरक्षक तयार करणे, त्यांना प्राशिक्षण देणे, कायद्याची माहिती देणे, इत्यादी.
 

bottom of page