top of page

अंगकोरवाट विष्णूधाम कंबोडिया धर्मयात्रा...

एक दिव्य अनुभूती...!!!

Print_2 Page Flayer_Cambodia Sept 2025_Marathi.png

12 पेक्षा अधिक मंदिरे, 5 - स्टार हॉटेल, नॅशनल म्युझियम, अप्सरा नृत्य, एसी बसेस, शुद्ध शाकाहारी भोजन, अखंड इंटरनेट सुविधा, ग्रुप लीडर आणि टूर लीडर यांसह धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वारशाविषयक प्रवचनांचा अनुभव घ्या.

अंगकोरवाटचे दर्शन ही केवळ एक यात्रा नसून आपल्या आत्म्याला स्पर्श करणारी एक दैवी अनुभूती आहे.

प्रख्यात लेखक आणि भीष्म सनातन वैदिक हिंदू युनिव्हर्सिटी, अमेरिकाचे संचालक प्रा. क्षितिज पाटुकले यांच्या ओजस्वी वाणीतून आपण जेव्हा गेल्या दोन हजार वर्षांच्या प्राचीन कंबुज देशाचा (सध्याचा कंबोडिया) इतिहास ऐकतो, त्याच्या परंपरा, संस्कृती आणि समृद्ध सभ्यता यांचा परिचय करून घेतो, तेव्हा हृदयात रोमांच दाटून येतो आणि अभिमानाने उर भरून येतो. प्राचीन भारतीय हिंदू आणि बौद्ध जांनी कंबोडियामध्ये निर्माण केलेली राज्यव्यवस्था, त्यांची साम्राज्ये, त्यांनी उभारलेली भव्य मंदिरे, अद्वितीय स्थापत्यकला आणि शिल्पकला, देवराजासारख्या अद्भुत परंपरा, तक्षशिलेसारखी विद्यापीठे, नागदेवता आणि अप्सरांच्या पौराणिक कथा — या सर्वांमधून आपण भारताच्या भव्य इतिहासाचा विस्तार अनुभवतो. असे वाटते जणू आपला एखादा पूर्वजन्म कंबुज देशात झाला होता आणि त्या दिव्य भूमीशी आपला एक आत्मीय बंध आहे.

आजवर १२०० हून अधिक भारतीयांनी विश्व मंदिर परिषदेच्या धर्मयात्रांमधून अंगकोरवाटच्या या दिव्य अनुभूतीचा अनुभव घेतला आहे. आता ती संधी तुमची आहे.

प्रा. क्षितिज पाटुकले आणि विश्व मंदिर परिषद यांनी एक कोटी भारतीयांना अंगकोरवाट–कंबोडियाचे दर्शन घडविण्याचा संकल्प केला आहे.​​

यात्रा तपशील:

​​​१. यात्रा कालावधी : ​७ दिवस / ६ रात्री

२. यात्रा तारीख: १० ते १७ डिसेंबर २०२५

३. भारतातील यात्रेकरूंसाठी: ₹७५,०००/- (सर्व खर्चांसह, ई-व्हिसा)

+ विमान तिकीट

४. भारताबाहेरील यात्रेकरूंसाठी: $ 900 USD (सर्व खर्चांसह) + ई - व्हिसा + विमान तिकीट
​५. ग्रुप डिस्काउंट - १० व्यक्तींच्या ग्रुप वर १० % सवलत (९ व्यक्तींवर १ व्यक्ती )

WhatsApp Image 2025-08-28 at 17.27.04_7d8cf784.jpg
​दिवस ०१

प्राचीन भारतीय संस्कृती आणि स्थापत्यकलेचा मंत्रमुग्ध करणारा प्रवास...

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई (BOM) येथून आमच्या सोबत किंवा भारतातील / भारताबाहेरील कोणत्याही विमानतळावरून प्रस्थान. 

20171126_Angkor_Wat_4712_DxO.jpg

​अंगकोरवाट विष्णुधाम

20191108042456_1987117011_13124_0.jpg

टोन्ले सॅप

taprohmtemple.jpg

ता प्रोम व प्रीह खा वृक्ष 

Apsara Dance.jpg

अप्सरा नृत्य

Bayon.jpg

अंगकोर थोम आणि बयॉन

Banteay-Srei-Lady-Temple-Cambodia-16.jpg

बांटी श्री अर्थान त्रिभुवनेश्वर

kbal-spean-cambodia-151.jpg

सहस्त्रलिंग 

अंगकोरवाट मंदिर दर्शन

धर्मयात्रा पॅकेज :

भारतातील यात्रेकरुंसाठी : ₹ ७५,००० /- (व्हिसा, टॅक्सेस सर्व खर्चासहित) + हवाई जहाज प्रवास तिकीट

भारताबाहेरील यात्रेकरूंसाठी : $ 900 USD (सर्व खर्चांसह) + ई-व्हिसा + हवाई जहाज प्रवास तिकीट

आपल्या जवळ किमान ४५ दिवसांची वैधता असणारा पासपोर्ट आवश्यक आहे.

ग्रुप बुकिंग डिस्काउंट:  10 व्यक्तींच्या ग्रुप वर 10% सवलत (9 किंवा अधिक जणांवर 1 व्यक्ती फ्री)

भारतामधील प्रमुख विमानतळांवरून ये-जा (राउंड-ट्रिप) विमानतिकीटांचा खर्च साधारण ₹३२,०००/- ते ₹५०,०००/- पर्यंत आहे.

विमानतिकीट बुकिंग सेवा प्रत्यक्ष दराने अत्यल्प सेवा शुल्कासह उपलब्ध आहे.

नोंदणी करताना आगाऊ रक्कम (Advance Amount) : ₹ ४०,००० /-

उर्वरित रक्कम (Balance Amount) – १० नोव्हेंबर २०२५ पर्यंत जमा करावी लागेल.

 

✅ बँक खात्याचे तपशील :

Account Name : Vishwa Mandir Foundation
Bank : Bank Of Maharashtra, Deccan Gymkhana Branch, Pune
Current Account Number : 60358923479
IFS Code : MAHB0000003

✅ अमेरिकेतील यात्रेकरुंसाठी Zelle Code : bhishmaindicusa@gmail.com

प्रवास खर्चामध्ये समाविष्ट:

  1. सिएम रीपमधील ५ स्टार हॉटेलमधील निवास, ट्विन शेअरिंग रूम

  2. हवाई प्रवास वगळता भारतीय नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण

  3. ब्रॉशरमध्ये नमूद केलेल्या सर्व पर्यटन स्थळे आणि मंदिर भेटी प्रवेश शुल्कासह

  4. अप्सरा नृत्य, टोनले सॅप, नॅशनल म्युझियमचे शुल्क समाविष्ट

  5. प्रत्येकाला ट्रॅव्हल सिम कार्ड कॉलिंग + डेटा सुविधा

  6. प्रवासादरम्यान प्रति व्यक्ती प्रति दिवस दोन बाटल्या पाणी

  7. ई-व्हिसा

  8. ड्रायव्हर, सहाय्यक इत्यादींना देण्यात येणारी टिप्स

  9. गाइडचे मानधन

प्रवास खर्चामध्ये असमाविष्ट:

  1. फ्लाईट तिकिट्स

  2. वैयक्तिक खर्च जसे की खरेदी, वैद्यकीय खर्च आणि इतर खर्चे

  3. भोजनाच्या वेळेपलीकडील सर्व प्रकारचे पेय व पॅकबंद पाणी

  4. ट्रॅव्हल इन्शुरन्स

  5. विमान प्रवासादरम्यान ले-ओव्हरमध्ये होणारे खानपान व इतर खर्चे

  6. वरील यादीत नमूद न केलेले इतर कोणतेही खर्च

  7. एका व्यक्तीकडून पूर्ण खोली घेतल्यास अतिरिक्त शुल्क : रु. २१,०००/- किंवा USD ३०० (६ दिवसांसाठी)

  8. अतिरिक्त एक दिवस राहण्यासाठी : एका दिवसाचे अतिरिक्त निवास – रु. ८,०००/- किंवा USD १०० (२ व्यक्तींसाठी प्रति दिवस)

Cancellation Policy
Amount
किमान:

५३% (₹ ४०,०००/-)

४० दिवसांपूर्वी रद्द केल्यास:

५३% (₹ ४०,०००/-)

२० दिवसांपूर्वी रद्द केल्यास:

६६% (₹ ५०,०००/-)

० ते २० दिवसांमध्ये रद्द केल्यास:

१००% (₹ ७५,०००/-)

सूचना आणि माहिती :

  • कंबोडियातील बहुतांश मंदिरांमध्ये जास्त पायी चालावे लागत नाही, परंतु अंकोरवाट विष्णुधाम मंदिरात तुम्हाला साधारण ३ ते ४ तासांत एकूण ३ किमी पायी चालावे लागेल.

  • ता प्रोम येथे तुम्हाला साधारण २ तासांत १.५ किमी ते २ किमी इतके पायी चालावे लागेल.

  • व्हीलचेअर सेवा अतिरिक्त खर्चावर उपलब्ध आहे – $२५ USD प्रति व्हीलचेअर प्रति दिवस. व्हीलचेअरसाठी सहाय्यक हवा असल्यास अतिरिक्त $२५ USD प्रति दिवस शुल्क लागू होईल.

  • कंबोडियामध्ये ज्या विमानतळावर तुम्ही उतरणार आहात त्याचे नाव सियाम रीप (SAI) आहे.

  • तुम्ही भारतातील किंवा जगातील कोणत्याही विमानतळावरून सियाम रीप विमानतळावर (SAI) पोहोचू शकता आणि त्याच विमानतळावरून परतीचा प्रवास करू शकता.

  • तुम्ही आमच्या ग्रुपसोबत पुणे आणि मुंबई येथून प्रवास करू शकता आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, अंधेरी, मुंबई (BOM) येथून उड्डाण करू शकता.

  • विमान तिकीट बुकिंग सेवा प्रत्यक्ष दराने अत्यल्प सेवा शुल्कासह उपलब्ध आहे.

  • हॉटेलमध्ये पोहोचल्यावर तुम्हाला एक स्थानिक सिम कार्ड दिले जाईल. यामुळे संपूर्ण प्रवासादरम्यान तुम्ही व्हॉट्सअपद्वारे सर्वांशी जोडलेले राहाल. तुमचे नातेवाईक कधीही तुम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क करू शकतील. तुम्ही नेहमी ग्रुप  आणि टूर लीडरशी जोडलेले राहाल.

  • आमचे स्वयंसेवक दुसऱ्या दिवशी सियाम रीप विमानतळावर तुमचे स्वागत करतील. त्यांचे संपर्क क्रमांक तुमच्याकडे आधीपासून असतील. तुम्ही विमानतळाच्या आतून त्यांना फोन करू शकता.

  • काही अपरिहार्य कारणास्तव प्रवास कार्यक्रमात बदल होऊ शकतो.

  • न्यायक्षेत्र मर्यादा – कोणत्याही कायदेशीर तक्रारीसाठी न्यायक्षेत्र मर्यादा पुणे शहर न्यायालयापुरती राहील.

भारताबाहेरून प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंकरिता सूचना:

  • तुम्ही धर्मयात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी करू शकता.

  • अमेरिकेतून येणारे प्रवासी आमच्या यूएसए कार्यालयात Zelle Code द्वारे पेमेंट करू शकतात.

  • अमेरिकेसाठी संपर्क व्यक्ती – श्री. नितीन बर्वे – +1 (650) 315-1128

  • भारत आणि अमेरिका याशिवाय इतर देशांमधून येणारे प्रवासी आमच्या भारतातील बँक खात्यावर थेट SWIFT द्वारे किंवा PayPal द्वारे पैसे जमा करू शकतात.

  • तुम्हाला ११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत किंवा त्याआधी सिम रीप (SAI) विमानतळावर पोहोचणे आवश्यक आहे. परतीचे तिकीट १६ डिसेंबरसाठी, उपलब्धतेनुसार आणि तुमच्या सोयीप्रमाणे बुक करावे.

  • तुम्हाला आपल्या देशातून ई-व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. ही सोपी आणि ऑनलाइन प्रक्रिया आहे. साधारणपणे ३ ते ४ दिवसांत व्हिसा जारी केला जातो.

whatsapp-computer-icons-logo-clip-art-whatsapp-removebg-preview.png

🟧 विश्व मंदिर परिषद - पुणे
📱 अपूर्वा राऊत - 7066250282 

६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, डेक्कन जिमखाना, पुणे - 411004

विश्व मंदिर परिषद

संपर्क/ व्हॉटसअप : 7066250362 

622, जानकी रघुनाथ, पुलाचीवाडी, जंगली महाराज रोड, डेक्कन जिमखाना, पुणे - 411004 

  • Grey Instagram Icon
  • Grey YouTube Icon
  • Grey Facebook Icon

धन्यवाद 

©2025 by Vishwa Mandir Parishad

bottom of page